सांजवेळी चांदण्याणी भरलेल्या आकाशाखाली थंडगार वाऱ्याची मज्जा घेत अंगणात आजोबांच्या सोबत बाजल्यावर बसून स्वतःच्या विचारात दंग होऊन जगाच्या पसऱ्याचा अगणित आकाशगंगाचा अस्तित्वाची जाणीव करत अचंबित होत आणि परत न संपणाऱ्या विचारांच्या कृष्णविवरात डुंबून जायला मिळेल का परत आता विचारांना बांध घातलेत
रानवारा चेहऱ्यावर घेत, अथांग पसरलेलं मैदान डोळ्यात सामावत अंगातील रोम अन रोम जागे करत पायात हजार अश्वांच बळ भरून छातीमध्ये सामर्थ्यचा हुंकार भरून निघेल मी प्रवासा दूरदेशी जिथे पर्वतांच्या गाभ्यातून नद्या उगम घेतील जिथे महाकाय वृक्ष गगनाला भिडायला निघाले असतील जिथून झाले असतील उत्क्रांतीच्या हजारो गाथा जिथे कधी असतील हिमयुगाचे निशाण जिथून ह्या ईश्वराच्या अगाध लीलांचा पसारा मांडला गेला असेल बदल झाले असतील ज्या ह्या मनाच्या गाभाऱ्यात समावणार नाहीत असा प्रवास, उकलायला कोडी स्वतःच्या अस्तित्वाची, एक अन अनेक