Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

सांज

सांजवेळी चांदण्याणी भरलेल्या आकाशाखाली थंडगार वाऱ्याची मज्जा घेत अंगणात आजोबांच्या सोबत बाजल्यावर बसून स्वतःच्या विचारात दंग होऊन जगाच्या पसऱ्याचा अगणित आकाशगंगाचा अस्तित्वाची जाणीव करत अचंबित होत आणि परत न संपणाऱ्या विचारांच्या कृष्णविवरात डुंबून जायला मिळेल का परत आता विचारांना बांध घातलेत

प्रवाशी माणसं...

रानवारा चेहऱ्यावर घेत, अथांग पसरलेलं मैदान डोळ्यात सामावत अंगातील रोम अन रोम जागे करत पायात हजार अश्वांच बळ भरून छातीमध्ये सामर्थ्यचा हुंकार भरून निघेल मी प्रवासा दूरदेशी जिथे पर्वतांच्या गाभ्यातून नद्या उगम घेतील जिथे महाकाय वृक्ष गगनाला भिडायला निघाले असतील जिथून झाले असतील उत्क्रांतीच्या हजारो गाथा जिथे कधी असतील हिमयुगाचे निशाण जिथून ह्या ईश्वराच्या अगाध लीलांचा पसारा मांडला गेला असेल बदल झाले असतील ज्या ह्या मनाच्या गाभाऱ्यात समावणार नाहीत असा प्रवास, उकलायला कोडी स्वतःच्या अस्तित्वाची, एक अन अनेक
भेटीची ओढ वेळेला ढकलता येईल का पुढे आणि जेंव्हा भेटशील तेंव्हा थांबवेल मी भांबावून गेलो तर जवळ करशील जत्रेत हरवायची लहानपणाची सवय आणि डोळ्यात डोळे गुंतवून टाकेल काही जुने तराने अजून बाकी आहेत आसव म्हणतात मोती असता आले डोळ्यात माझ्या तर समजून घेशीलच....
असेल मी नसेल मी आज आणि उद्या राहतील फक्त निशाण फडफडत किती काळ? कोणी पाहिलंय मला कृष्ण माहितीय राम तर आधीपासूनच मंदिरात अडकलाय राम देव असूनपण मग आले विजयराय आणि कृष्ण देवराय अशोक पण आणि चाणक्य पण संत परंपरा तर ज्ञानेशा पासून गाडगेबाबा पर्यत छत्रपती आले आणि आले त्यांचे वंशज काही थेट आणि बरेच असेच मग आले ब्रिटिश आणि आणि मग आपलेच लोक इतिहास सांगितलं जातो चांगला आणि वाईट त्यात मग युद्ध आहेत आणि संहार जास्त सत्तेच्या पाठी सगळे खेळ मग मी म्हणतो असेल मी नसेल मी आज आणि उद्या राहितल तर फक्त निशाण किती काळ!!!